हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही पुणेरी पाट्यांबद्दल ऐकलं असेल किंवा पाहिले असेल. तसाच काहीसा प्रकार आता सोलापूर मध्ये पाहायला मिळाला आहे. सोलापूरमध्ये पाळीव कुत्रे आणि त्यांच्या मालकांना वैतागून कोणीतरी पुणेरी पद्धतीचे बॅनर लावले आहे. शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराभोवती वॉकिंग ट्रॅकवर हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरच्या माध्यमातून वॉकिंग ट्रॅकसाठी पाळीव कुत्र्यांना सोबत घेऊन येणाऱ्यांना कडक शब्दात चपराक लगावण्यात आली आहे. या वॉकिंग ट्रॅकवर व्यायाम करण्यासाठी सकाळपासूनच लोक जमतात . परंतु परंतु कुत्र्यांमुळे ट्रॅकवर घाण होत असल्यामुळे काहीजण नाराजी व्यक्त करत होते. त्याच पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले हे बॅनर्स सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये असं या बँनर वर लिहीत कुत्र्यांना घेऊन येणाऱ्या मालकांवर एकप्रकारे निशाणा साधण्यात आला आहे. या फलकानंतर तरी कुत्रे मालक शाहणे होतील का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.