बोलेरो-दुचाकीच्या भीषण अपघात आजोबा-नातवाचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । पिक-अप जीप आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात आजोबा आणि नातू जागीच ठार झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. कुर्डूवाडी तालुका माढा इथं दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात अभिजित रमेश मोरे (वय–२२, रा. कन्हेरगाव), महादेव नामदेव डांगे (६५, रा. पिंपळनेर, माढा) यांचा मृत्यू झाला.

टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने बोलेरो पिकअप भरधाव वेगात निघाली होती. ही पिकअप कुर्डूवाडी हद्दीत झुंडरे वस्ती नजीक आली असता, ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील आजोबा आणि नातू जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर मोटारसायकल दूरपर्यंत फेकली गेली. यात गंभीर जखमी होऊन आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला.आजोबा आणि नातवाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येते आहे. जीप आणि ट्रक चालक अतिशय वेगाने वाहनं चालवतात. त्यामुळे अपघात घडत असल्याचं म्हटलं जातंय. याचा मोठा फटका छोटी वाहन आणि दुचाकीस्वारांना होत आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत के.एल राहुलने घेतली मोठी झेप

100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी