सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधींना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

दरम्यान आज सोलापूर शहरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सूतगिरणी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे, या पाण्यामुळे नागरिकांचं मोठ्ठया प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी कामे न केल्याने हा निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं नागरिकांनी सांगितले.

Leave a Comment