सोलापुरात एकाच दिवशी आढळले 48 कोरोना बाधित, एकूण संख्या 264

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता मोहोळ तालुक्यात प्रवेश केला आहे. मोहोळ तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पेनुर येथे आढळल्यानंतर आज ढोक बाभुळगाव, सावळेश्वर आणि पाटकूल येथे नवीन कोरोना बाधित रुग्ण आज आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात आज एका दिवशी 48 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सोलापुरातील एकूण रुग्ण संख्या 264 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी उपचार करुन कोरोना मुक्त केलेले 12 रुग्ण (नऊ पुरुष व तीन महिला) यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 48 रूग्णांमध्ये एमआयडीसी रोड वरील संजीव नगर मधील एक पुरुष, जुळे सोलापुरातील गजानन नगर येथील एक पुरुष, होटगी रोड वरील बजरंग नगर येथील एक स्त्री, आंबेडकर उद्यान जवळील सम्राट चौकातील मंत्रि चंडक येथील एक पुरुष, सम्राट चौकातील मंत्री चांडक येथील पोलिस कॉलनी मधील एक पुरुष, रविवार पेठेतील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील पोलिस वसाहतीतील एक पुरुष, जुळे सोलापुरातील समृद्धी हेरिटेज येथील एक महिला, मोदीखाना येथील निर्मिती टॉवर मधील एक पुरुष, कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण हॉस्पिटल मधील एक पुरुष, सिद्धेश्वर पेठ येथील सहा पुरुष व दोन महिला, सदर बाझार लष्कर येथील दोन पुरुष व दोन महिला, लोकसेवा शाळेजवळील एक पुरुष, शास्त्रीनगर येथील तीन पुरुष व चार महिला, बुधवार पेठेतील मिलिंद नगर येथील एक महिला, तेलंगी पाछा पेठ येथील एक महिला, विडी घरकुल मधील तुळशी शांती नगर येथील एक महिला, सिद्धार्थ चौकातील एक महिला, कुमार स्वामी नगर येथील एक पुरुष, नीलम नगर येथील एक पुरुष, हुडको कॉलनी कुमठा नाका येथील एक पुरुष व एक महिला, मोदीखाना येथील एक पुरुष, जुना कुंभारी रोड गवळी वस्ती येथील एक पुरुष, कुंभारी नाका येथील एक महिला, सिव्हिल क्वॉर्टर येथील एक महिला, होटगी नाका येथील मुलींच्या वस्तीगृहातील एक महिला, मजरेवाडी सहारा नगर येथील एक पुरुष, शिवाजीनगर मोदी येथील एक पुरुष, मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील एक पुरुष, मोहोळ तालुक्यातील ढोक बाभुळगाव येथील एक पुरुष, सावळेश्वर येथील एक महिला असे 48 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुळे आजपर्यंत मृत झालेल्या व्यक्तींची संख्या 14 असून 209 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोनावर मात करून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 41 झाली आहे.

Leave a Comment