सोलापुरातील कोरोना रुग्णवाढीला शरद पवार, सुशीलकुमार शिंदेच जबाबदार- संतोष पवार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२१७ झाली आहे. १०० च्या जवळपास रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असल्याचे भाजपा नेते संतोष पवार यांनी म्हंटले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार यांना माढा येथे लोकसभेच्या उमेदवारीसाठी विरोध केला होता. तसेच सुशीलकुमार शिंदे यांना जिल्ह्यातील नागरिकांनी दोन वेळा पराभूत केले होते. याचा हे दोन्ही नेते सूद घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संतोष पवार म्हणाले, “सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नाही. कारण माढा लोकसभेच्या वेळी शरद पवारांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील लोकांनी केलेला विरोध होय. याचाच सूड म्हणून पवार कुटुंबांने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे लोकसभेत २ वेळा येथील नागरिकांकडून पराभूत केले गेले म्हणून त्यांनी जनतेच्या विरोधात सूड उगवला आहे. या दोन्ही नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणूनच सोलापूरची वाताहत झालीआहे. आता या दोघांनी एकत्र येऊन सोलापूरचे प्रशासन हातात घेऊन सोलापूरची व्यवस्था करायला हवी आहे.” संतोष पवार यांनी या दोन्ही नेत्यांना जिल्ह्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन या दोघांच्या मागे रेटा लावावा की, दोघांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्याला वाचवा. सोलापूर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या शंभरी पार करून आता हजाराच्या वर गेली आहे. असाही उल्लेख त्यांनी केला. या दोन्ही नेत्यांना उद्देशून ते म्हणाले, या जनतेनेच तुम्हांला सार्वजनिक रित्या निवडून दिले आहे. त्यांनीच तुम्हांला मुख्यमंत्री केले आहे. कधी काळी तुम्ही इथले पालकमंत्री होता. आता एकत्र येऊन या जिल्ह्याचे प्रशासन हातात घ्या म्हणजे लोक सुटकेचा श्वास घेतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment