महापालिकेने कर्मचार्यांना ठेवले बांधून, काम न करणार्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा असाही उपयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | महानगरपालिकेचे कामगार कामावरती येतात आणि खाजगी कामासाठी बाहेर निघून जातात. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. एखादा कर्मचारी त्याच्या जागी नसेल तर त्याबद्दल विचारणा केल्यास तो मिटिंगला गेला असल्याची बतावणी करण्यात येते. इतकंच काय तर पाणी पुरवठ्याचे कामगार ही पाणी सोडण्याच्या वेळी कामाच्या ठिकाणी नसतात. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने कामगारांच्या हातात जीपीएस लोकेशनचे घड्याळ बांधून त्यांना कामाच्या जागेवर बांधून ठेवले आहे.
तंत्रज्ञानाचा असाही वापर केला जाऊ शकतो हेच या प्रकारातून उघड होते. या प्रक्रियेत कोणता कामगार कोठे आहे हे संगणकाच्या एका क्लिक वर समजणार आहे. ज्यातून कामगारांवर मोठा धाक बसणार आहे. जीपीएस घड्याळांच्या निर्णयाचे जनसमन्यातून स्वागत केले जाते आहे.

Leave a Comment