हृदयद्रावक ! खेळता खेळता शेततळ्यात बुडून तीन चिमुरड्यांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत पाच जणांचा बुडून मृत्यू झल्याची घटना ताजी असताना आणखी एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.यामध्ये खेळता खेळता तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेततळ्यात पडून तिघे चिमुरडे बुडाले आणि पाण्यात गुदमरुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे या तीन चिमुरड्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनायक भरत निकम, सिद्धेश्वर भरत निकम, हे दोघे सख्खे भाऊ खेळता खेळता शेततळ्यात बुडाले. यावेळी त्यांसोबत कार्तिक मुकेश हिंगमिरे हा देखील त्यांच्यासोबत खेळत होता. त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विनायकचं वय 12 वर्ष, सिद्धेश्वरचं वय 8 वर्ष तर कार्तिक हा अवघ्या पाच वर्षांचा होता. या दुर्दैवी घटनेमुळे निकम आणि हिंगमिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिघांची गट्टी जमली होती, पण…
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या गावातील भरत निकम हे शेत मजुरीचं काम करतात. ते शेतमजुरी करण्यासाठी शेटफळ इथं आपल्या मेहुण्याकडे आले होते. मुकेश ज्योतिनाथ हिंगमिरे यांच्याकडे शेतमजुरीसाठी आलेल्या निकम कुटुंबातील दोघा सख्ख्या भावांची आणि हिंगमिरे यांच्या मुलासोबत चांगलीच गट्टी जमली होती. मागच्या काही महिन्यांपासून हे दोन्ही कुटुंब शेटफळ इथं काम करत होते. घटनेच्या दिवशी आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर तिघेही खेळत होतं. यानंतर सोमवारी दुपारी तिघेही शेततळ्याकडे पोहायला गेले. यावेळी पाय घसरुन तिघेही पाण्यात पडले आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मजुरीवरुन जेव्हा आई-वडील घरी परतले, तेव्हा मुलं कुठंच दिसत नाही म्हणून त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली असता त्यांचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला.

Leave a Comment