साखर कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या; २२ तास उलटले तरी मृतदेह कुटीर रुग्णालयातच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कामगार राजेंद्र बलभीम जाधव(वय ४२, राहणार शेलगाव भाळवणी) यांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरात पैशांची विवंचना असल्या कारणाने आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं जाधव यांच्या पत्नीने सांगितलं.

करमाळा तालुक्यातील सहकाराचे केंद्रबिंदू ठरलेला व सध्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची मागील काही वर्षांपासून बिकट अवस्था सुरू आहे. कामगारांचे पगार थकलेत तर शेतकरी ऊस उत्पादक यांची देणी ही थकली आहेत.

विशेष बाब म्हणजे कारखान्यातील कामगारांच्या एक दोन नाही तर तब्बल ४६ महिने म्हणजे जवळपास ४ वर्षाच्या पगारी थकल्या आहेत आणि आता तर या कामगारांना जबरदस्तीने घरी बसवले आहे. मग या कामगारांचे संसार चालणार कसे.? मुलाबाळांनी खायचं काय.? या आर्थिक विवंचनेतूनच कामगार आता स्वतःच जीवन संपवू लागले आहेत.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

फेसबुकच्या मार्केटिंग संचालकपदी अविनाश पंत; भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी फेसबुकची नवी रणनीती

सांगली जिल्ह्यामधील शिरगावात एकाच रात्रीत ८ ठिकाणी घरफोड्या

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचा केंद्राचा निर्णय असंवैधानिक – बाळासाहेब थोरात

Leave a Comment