Solar Eclipse 2024 : गेल्या 800 वर्षांत पहिल्यांदाचं दिसलं ‘असं’ सूर्यग्रहण; आश्चर्यकारक दृश्याबाबत नासाने व्यक्त केलं आश्चर्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Solar Eclipse 2024) नुकतीच आकाशात एक अत्यंत वेगळी, अद्भुत आणि आश्चर्यकारक घटना घडल्याचे समोर आले आहे. या वर्षातील पहिले सुर्यग्रहण हे दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी पहायला मिळाले. तब्बल ५० वर्षानंतर सुमारे ५ तास २५ मिनिटे चाललेले हे सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण ठरले आहे. हे सूर्यग्रहण गेल्या ८०० वर्षातील अत्यंत वेगळे आणि अद्भुत असे सूर्यग्रहण ठरले आहे. याचे कारण म्हणजे सूर्यग्रहणावेळी एक अशी घटना घडली जी फारच आश्चर्यकारक होती. तसेच नासाच्या तज्ञांना देखील थक्क करणारी अशी ही घटना ठरली. या सूर्यग्रहणातील या अनोख्या दृश्याचा एक व्हिडिओ नासाच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तो काय आहे? हे पाहूया.

काय आहे या व्हिडिओत?

नासाने सूर्यग्रहणातील आश्चर्यकारक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नासाचे शास्त्रज्ञ सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) पाहत असताना त्यांच्या दृष्टीस एक अत्यंत चमत्कारिक गोष्ट पडल्याचे दिसते. नासाने ही पोस्ट शेअर करताना म्हटलंय की, नुकतेच दिसून आलेले सूर्यग्रहण हे इंडियानापोलीसमध्ये पसरले आहे. तब्बल ८०० पेक्षा अधिक वर्षांनी या शहरात पहिल्यांदाच अशी ही अद्भुत खगोलीय घटना पाहायला मिळाल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. महत्त्वाची बाब अशी की, हे सूर्यग्रहण भारतात दिसले नाही. ते का? हे जाणून घेऊ.

हे सूर्यग्रहण भारतात दिसले नाही, कारण.. (Solar Eclipse 2024)

नासाच्या तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हे सूर्यग्रहण गेल्या ५० वर्षातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण ग्रहण होते. खग्रास ग्रहणावेळी जिथे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्या ठिकाणास ‘खग्रास मार्ग’ म्हणून संबोधले जाते. कारण, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये असतो तेव्हाच ‘खग्रास सूर्यग्रहण’ होते. यावेळी खग्रास सूर्यग्रहण भारतात दिसले नाही आणि याचे कारण म्हणजे भारत आणि भारतीय उपखंड हे प्रदेश खग्रास मार्गाच्या बाहेर आहेत. त्यामुळे हे सर्वात मोठे सूर्यग्रहण असून देखील भारतात दिसले नाही.

‘या’ दिवशी भारतात सूर्यग्रहण दिसणार

नासाच्या तज्ञांनी दिलेल्या महत्वाच्या माहितीनुसार, भारतामध्ये दिनांक २१ मे २०३१ रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकाराचे असणार आहे. (Solar Eclipse 2024) जे देशभरातील अनेक शहरांसह केरळ आणि तामिळनाडूमध्येसुद्धा दिसणार आहे. त्यावेळी जेव्हा सूर्यग्रहण होईल तेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येईल. परिणामी चंद्राच्या माध्यमातून सूर्याचा २८.८७% भाग व्यापला जाईल आणि यातून सूर्याचे केंद्र झाकून जाईल. यामुळे सूर्याच्या केवळ बाह्य कडा प्रकाशित होतील.