Solar Generator | देशात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. यामुळे आता उन्हाळ्यात खेडेगावातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला जातो. जर तुमच्या भागातही वारंवार लाईट जात असेल आणि तुमच्या घरात पंखा, लॅपटॉप, स्मार्टफोन टीव्ही यांसारखी उपकरणे असतील तर ती तुम्हाला चार्ज करता येत नाही आणि पर्यायाने वापरता येत नाही. तुमच्याकडे वारंवार वीज खंडित होत असेल आणि तुम्हाला ही उपकरणे चार्ज करायची असतील तर आत्ता ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी येणार आहे.
कारण आता आम्ही तुम्हाला अशा एका जनरेटरची (Solar Generator) माहिती सांगणार आहोत. जे आकाराने अत्यंत लहान आहे पण ते चालवायला अगदी सोपे आहे. त्यासाठी फक्त सूर्यप्रकाश हवा असतो. या जनरेटरच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोन आणि लॅपटॉप देखील चार्ज करता येतो. त्याचप्रमाणे तुम्ही टीव्ही आणि पंखा देखील चालवू शकतात. हे जनरेटर तुम्ही ऑनलाईन देखील विकत घेऊ शकता.
या जनरेटरचे नाव SARRVAD पोर्टेबल सोलर पावर जनरेटर (Solar Generator) S- 150 असे आहे. हे जनरेटर एका लहान आकाराच्या बॅटरी एवढे आहे. त्यामुळे आपण ते सहज कुठेही नेऊ शकतो. यामुळे आपण टीव्ही लॅपटॉप यांसारखी उपकरणे चालवू शकतो. हे अतिशय हलके आहे आणि शक्तिशाली उपकरण आहे.
या डिवाइसमध्ये विशेष काय | Solar Generator
हे अतिशय शक्तिशाली जनरेटर आहे. ज्याची क्षमता 42000 mAh 155 Wh आहे याच्या मदतीने तुम्ही आयफोन सुमारे 7 वेळा चार्ज करू शकता याचे वजन फक्त १.१९ किलो ग्रॅम एवढे आहे. तुम्ही हे सोलर पॅनलने सूर्यप्रकाशात चार्ज करू शकता. याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर हे तुम्हाला केवळ एकूण 19 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल. हे आकाराने खूप लहान आहे. त्यामुळे तुम्ही बागेत कुठेही घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आता लाईट नसली तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही ॲमेझॉनवरून देखील हे जनरेटर विकत घेऊ शकता.