Solar Panel Subsidy Yojana | आपले सरकार हे नेहमीच नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असतात. जेणेकरून सामान्य नागरिकांना देखील त्याचा फायदा होईल. आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे आयुष्य जगता येईल. देशात सौर ऊर्जेचा नेण्यासाठी आपले सरकार नेहमी प्रयत्न करत आहे. आता सोलर पॅनल बसवण्यासाठी बँकही ग्राहकांना निधी उपलब्ध करून देत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन रूफ टॉप सोलार पॅनेल योजनेची घोषणा केलेली आहे. या नवीन योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील जवळपास 1 कोटी लोकांना घरामध्ये सौर ऊर्जा बसवून देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे.
मागील महिन्यात अर्थ मंत्रालय अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि बँकांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हे मान्य करण्यात आले आहे की, रस्ता राष्ट्रीय पोर्टल ग्राहकांना घर बांधण्यासाठी दिलेल्या कर्जाची जोडलेले आहे.
जनजागृती मोहीम राबवणार
सरकारने दिलेले माहितीनुसार आता मोफत वीज योजनेद्वारे सुमारे 90 टक्के ग्राहक त्यांच्या घरावर हे सौर पॅनल बसू शकतील. गृह कर्जासह सौर ऊर्जा पॅनलवर देखील सबसिडी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोक सौर पॅनलचा वापर करू शकतात. सरकारने बँकांना देखील या योजनेमध्ये सामील करून घेतले आहे. आणि ग्राहकांना सोलर टॉप पॅनलबद्दल जागृत केले आहे.
1 कोटी नागरिकांना मिळणार लाभ | Solar Panel Subsidy Yojana
पंतप्रधान मोदींनी या नवीन रूफ टॉप सोलर पॅनलची घोषणा केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट 1 कोटी लोकांच्या घरामध्ये सौर ऊर्जेद्वारे प्रकाश यावा हे आहे. सरकारच्या या योजनामुळे 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. या प्रकल्पात सरकारने 75 हजार कोटी रुपयांपेक्षा देखील जास्त गुंतवणूक केली आहे.
मिळणार मोफत वीज
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देशातील गोरगरिबांनी मध्यमवर्ग लोकांचा विचार करून सरकारने ही घरांमध्ये रूफ टॉप सोलर पॅनल बसवण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये कुटुंबांना दर महिन्याला 320 युनिट वीज मोफत वापरता येणार आहे. पीएम सूर्य घर योजना असे या योजनेचे नाव आहे याबाबत पीएम मोदींनी देखील घोषणा केली आहे.
सरकारकडून किती अनुदान मिळणार
हे सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार आपल्याला अनुदान देखील देणार आहे. ही सबसिडी सुमारे 60 टक्के आहे. यासाठी तुम्हाला काही पैसे देखील लागणार आहेत. अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला प्रति किलो वॅट 3000 रुपये सबसिडी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 3 किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेचे सोलार पॅनल जर घेतले, तर तुम्हाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही महिन्याला 150 युनिट वीज वापरत असाल तर तुम्हाला 1 ते 2 किलो वॅट सोलर पॅनल लागेल यासाठी तुम्हाला सरकारकडून 30 हजार ते 60 हजार रुपये दरम्यान सबसिडी मिळेल.