Wednesday, February 8, 2023

पोटच्या मुलीला तीन वेळा विकून, लावले लग्न; वडील, सावत्र आई जेरबंद

- Advertisement -

औरंगाबाद – आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीची बळजबरीने परराज्यात दोनदा विकी करून तिसऱ्या वेळी लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये पिडीतेचे वडील, सावत्र आई व काकाला पोलिसांनी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तीन वर्षांपूर्वी उद्योगनगरी वाळूज मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस तिचे वडील, सावत्र आई व काका यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने गुजरात राज्यात एका महिलेला लाख रुपयात विकले होते. त्यानंतर पीडितेवर गुजरात मध्ये दोघांनी लैंगिक अत्याचार देखील केला होता. अत्याचारामुळे पीडिता आजारी पडल्यानंतर गुजरातमधून त्या महिलेने पीडितेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिला त्यांच्या स्वाधीन केले होते.

- Advertisement -

गुजरात मधून वाळूज ला आल्यानंतर काही दिवसांनी पीडितेची दुसऱ्यांदा नंदुरबार येथील एकाला विक्री करण्यात आली. त्यानेदेखील तिच्यावर दोन महिने लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती राहिली नंतर ते आजारी पडल्याने नंदुरबारचा त्या व्यक्तीने देखील मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना नंदुरबारला बोलावून घेतले व मुलीला त्यांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे पैशासाठी तीन वेळा विक्री करून तिचे लग्न लावणाऱ्या वडील (वय 47), सावत्र आई (वय 32) व काका (वय 40) या तिघांना हदगाव पोलिसांनी 21 सप्टेंबरला अटक केली. ही माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने हादगाव येथून या तिघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पोलिस पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एम. आर. घुनावत हे करत आहेत.