हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Solkadhi Benefits) रोजच्या गडबडीत आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला थोडे का होईना कमी पडत असतो. त्यामुळे अनेकदा संसर्गजन्य रोगांशी आपल्याला सामना करावा लागतो. वाढत्या उन्हाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे अशा दिवसात आपल्याला आरोग्याची अधिकाधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात अनेक लोकांना अपचन, पोटाच्या समस्या, ऍसिडिटी यांसारखे त्रास जाणवतात. जर तुम्हालाही असे त्रास जाणवत असतील तर सोलकढी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कोकणी भागातील अत्यंत लोकप्रिय पेय सोलकढी हे आमसुलापासून तयार केले जाणारे पेय आहे. जे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. (Solkadhi Benefits) यातील विशेष घटक जेवण पचवण्यास मदत करतात आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात होणार अपचनाचा त्रास टाळता येतो. चला तर सोलकढी कशी बनते? तिच्यातील कोणते गुणधर्म आरोग्यदायी आहेत? आणि उन्हाळ्यात सोलकढी पिण्याने काय फायदे मिळतात? ते जाणून घेऊया.
कशी बनते सोलकढी?
सोलकढी बनवण्यासाठी आपल्या घरात आढळणारे काही महत्वाचे पदार्थ लागतात. यात मूठभर आमसूल, २ हिरव्या मिरच्या, ३- ४ लसूण पाकळ्या, १ ओल्या नारळाचे दूध, मुठभर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ यांचा समावेश आहे. (Solkadhi Benefits)
सोलकढीसाठी मुठभर आमसूल कोमट पाण्यात साधारण २ ते ३ तास भिजवून ठेवावे लागतात. यानंतर आमसुल हाताने पाण्यात थोडी कालवून (कुस्करू नका) घ्या आणि हा अर्क गाळून घ्या. (Solkadhi Benefits) नारळाच्या साधारण ५ वाटी दुधात आमसुलाचे पाणी मिसळा आणि त्यात लसूण तसेच मिरची वाटून घाला. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळा. सोलकढी आंबट नसावी. तसेच घट्टही नसेल याची काळजी घ्या. तयार सोलकढी मस्त गारे गार करून प्या.
सोलकढीतील फायदेशीर गुणधर्म कोणते?
कोकम आणि ओलं खोबरं हे सोलकढीचे मुख्य घटक आहेत. (Solkadhi Benefits) कोकमात अँटिऑक्सिडंट, फायबर्स, विटामिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. तर ओल्या नारळात प्रथिने, विटामिन सी, खनिजे, अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरासाठी सोलकढी चांगली फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात सोलकढी पिण्याचे फायदे (Solkadhi Benefits)
1. बद्धकोष्ठता आणि अपचनापासून सुटका – पचायला जड असलेला कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ शकतो. खास करून उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर हमखास अपचन होते. अशावेळी सोलकढी प्यायल्याने पचन सुरळीत होते आणि अस्वस्थता कमी होऊन आराम मिळतो.
2. शरीरातील उष्णता कमी होते – उन्हाळ्यात जितकी जास्त गरमी असेल तितकी शरीरातील उष्णता वाढते. शरीरात उष्णता वाढली की, त्यामुळे आरोग्य विषयक विविध समस्या जाणवू लागतात. (Solkadhi Benefits) त्यापासून आराम मिळवायचा असेल तर कोणतेही सोडजन्य पेय पिण्यापेक्षा सोलकढी कधीही उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरते. यातील महत्वाचे पोषक घटक शरीराला आतून थंडावा देतात आणि उष्णता कमी करतात.
3. पित्ताच्या त्रासावर प्रभावी – अनेक लोकांना पित्ताचा प्रचंड त्रास असतो. काहींना पित्तामुळे शरीरावर जाडसर पुरळ येते. ज्यामुळे खाजदेखील सुटते. अशा समस्येने त्रासलेल्या लोकांनी आपल्या आहारात सोलकढीचा समावेश करावा. यामुळे पचनक्रिया सुधारून शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि पित्ताच्या त्रासापासून आराम मिळतो.
4. नितळ आणि तेजस्वी त्वचा – उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवतात. चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात, मुरूम येतात, टॅनिंग होतं. (Solkadhi Benefits) या सर्व समस्यांवर सोलकढी एक चांगला उपाय ठरू शकतो. कारण यामध्ये असणारे अँटिऑक्सिडन्ट तुमची त्वचा सतेज बनवण्यासाठी मदत करतात.