हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना पित्ताचा त्रास होताना दिसत आहे. अपुरी झोप ,बदलती जीवनशैली, अनियमित जेवण, बदललेले आहाराचे स्वरूप यामुळे अपचन किंवा अँसिडिटीचा त्रास होणे अशा अनेक समस्या होताना दिसतात. आम्लपित्त वाढल्यावर बऱ्याचदा जळजळ होणं, चक्कर येणं, अस्वस्थ होणं अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
पित्ताचा त्रास टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या –
★भरपूर पाणी प्या.
★सकस आहाराचं सेवन करा.
★ताजी फळे, भाज्या आणि कडधान्य यांचं समावेश करा.
★सोयाबीन, डाळी अशा फायबरयुक्त पदार्थ खा
★जंकफूड, मसाल्याचे पदार्थ यांचं सेवन टाळा.
★झोपेपूर्वी टीव्ही पाहु नका.
★नियमित व्यायाम करा.
★खाल्ल्यानंतर लगेचच झोपू नका.
★मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा.
★कांद्याचा रस किंवा टोमॅटोचा रस पिऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका.
★जेवणाच्या वेळा निश्चित करा, रात्री अपरात्री खाण्याची सवय टाळा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’