आरक्षण द्या, नाहीतर अख्खं मंत्रालय जाळून टाकू! अखिल भारतीय मराठा महासंघाचा गंभीर इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना । मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आता मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मराठा संघटनेचा मशाल मोर्चा येणार आहे, तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे.

याविषयी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नये, सरकारचं धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलाचं मरण झालं आहे. मातोश्रीवर आक्रोश मोर्चा, मशाल मोर्चा आहे, आम्ही लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चा काढून जगाला आदर्श दिला असं त्यांनी सांगितले.

याशिवाय सरकार कोणाचंही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खं मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in