महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : येत्या चार-पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी तुरळक अवकाळी पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

सध्या सकाळी काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर दुपारी किंचित असलेले ऊन तर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण अशी स्थिती असते. यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 7अंश सेल्सिअस पर्यंत घट झाली आहे. नांदेड डहाणू इथं घट होऊन ते 30 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर चंद्रपूर येथे सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून महाबळेश्वर येथे 20 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर प्रदेशचा पूर्वभाग आणि परिसर बिहार ते पूर्व विदर्भ पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू,तेलंगणा,कर्नाटक आणि रायलसीमा यादरम्यान कमी दाबाचा पट्टा असून तो समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात ही चक्रीय स्थिती आहे ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलो मीटर उंचीवर आहे याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होतो आहे.

विदर्भात हलक्या सरी

राज्यात दोन ते तीन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण बनले आहे गुरुवारी रात्री छत्तीसगड आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या यामध्ये चंद्रपूर मधील सावळी 4.2 मिलिमीटर गडचिरोलीतील आरमोरी दहा मिलिमीटर गोंदियातील सालेकसा 4.6 मिलिमीटर यवतमाळमधील राळेगाव 3.1 मिलिमीटर पाऊस पडला.

कोठे होणार अवकाळी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया, नागपूर,वर्धा,यवतमाळ या ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment