माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

0
74
Somnath Chaterji
Somnath Chaterji
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकत्ता | लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले आहे. ते ८९वर्षाचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १०ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. शुक्रवारी रुग्णालयात दाखल केल्या पासून त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सोमनाथ चॅटर्जी यांची लोकसभा सभापती म्हणून कारकीर्द वादळी ठरली होती. अमेरिकेसोबत झालेल्या अनु करारानंतर मनमोहनसींग सरकारवर आलेल्या अविश्वास ठरावात पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करण्यास त्यांनी विरोध केला होता. भारतीय संविधानाला आपण बांधील असून लोकसभेचा अध्यक्ष पक्षीय राजकारण आणि पक्षीय भूमिके पासून विभक्त असतो असे मत त्यांनी मांडले होते.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील शालीन नेता म्हणून चॅटर्जी यांची ओळख होती. त्यांची प्रकृती मागील काही वर्षापासून चिंताजनक बनली होती. त्यांच्यावर कोलकत्ता येथेल रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here