Dream 11 दीड कोटी जिंकणारे पुण्याचे PSI अडचणीत? नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dream 11 वर क्रिकेट टीम लावून तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळवलेले पुण्याचे PSI सोमनाथ झेंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऑन ड्युटी असताना जुगाराच्या अँप वर पैसे लावल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपचे अमोल थोरात यांनी याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सुद्धा दिले आहे. त्यामुळे आता कायदेशीर बाबी तपासून झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक पदी असलेले सोमनाथ झेंडे यांना क्रिकेटची आवड आहे. त्यातूनच त्यांना ऑनलाईन गेमिंगची आवड लागली होती. सध्या देशात आयसीसी वर्ल्डकप जोशात सुरु आहे. यातूनच उपनिरीक्षक झेंडे यांनी बांगलादेश आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या क्रिकेट मॅचआधीच आपली टीम ड्रीम इलेव्हन या गेमिंग अँप तयार केली. आणि मॅच संपल्यावर उपनिरीक्षक यांनी आपला मोबाईल तपासताच त्याचा लक्षात आले की त्यांनी तयार केलेली क्रिकेट टीम क्रमांक 1 वर आहे. ड्रीम इलेव्हनच्या स्पर्धेत त्यांची तयार केलेली टीम विजेती ठरल्यामुळे त्यांना तब्बल  दीड कोटी रुपये मिळाले.

मात्र आता त्यांच्यावर चौकशीच्या ससेमिरा मागे लागण्याची शक्यता आहे. कारण सध्या ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे. अशातच अनेकदा फसवणूक ही होते. तसेच झेंडे यांनी ऑन ड्युटी असताना अँप मध्ये पैसे लावले असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यामुळे प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.