Monday, February 6, 2023

हृदयद्रावक ! लोखंडी पाइपने मारहाण करत जन्मदात्या बापाची हत्या

- Advertisement -

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने लोखंडी पाइपने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणी देव्हाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव राजेश बंधाटे असे आहे तर आरोपी मुलाचे नाव रोहित बंधाटे असे आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत राजेश आणि आरोपी मुलगा रोहित यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली यानंतर या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून आरोपी मुलगा रोहितने आपल्या जन्मदात्या वडिलांना लोखंडी पाइपने डोक्यात आणि मानेवर सपासप वार करत त्यांची हत्या केली.

- Advertisement -

मुलाने केलेल्या मारहाणीत वडील राजेश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. यानंतर कुटुंबीयांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्य झाला. या प्रकरणी आरोपी रोहित बंधाटे याला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.