Monday, February 6, 2023

घोर कलियुग ! सासूचे जावयावर जडले प्रेम मग पुढे झाले असे काही…

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील बिबवेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली आहे. ह्या युवक आपल्या सासूला घेऊन कर्नाटकातून पळून पुण्याला आला होता. या ठिकाणी येऊन त्यांच्यात सारखी भांडणे होऊ लागली. या रोज रोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून त्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलत त्याने आपल्या सासूची गळा दाबून हत्या केली. यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.मृत महिलेचे नाव अनारकली महमद तेरणे असे आहे. ती मूळची बेळगाव येथील रहिवासी आहे. सध्या ती आपला २६ वर्षीय जावई असिफ आतारसोबत पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील शेळकेवाडी याठिकाणी राहात होती.सासूची हत्या केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी असिफ आतार याला अटक केली आहे. बिबवेवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

जावयाचे आणि सासूचे प्रेम
आरोपी असिफचा काही दिवसांपूर्वी मृत अनारकली मुलीसोबत काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले होते. त्यानंतर असिफ आणि त्याची सासू अनारकली यांची जवळीक वाढली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. या नंतर ते दोघेजण कर्नाटकातून पुण्याला पळून आले. पुण्यात आल्यानंतर असिफने मजुरीचे काम सुरु केले. यामधून त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. यादरम्यान त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. काही ना काही कारणावरून त्यांच्यामध्ये सतत खटके उडत होते.

- Advertisement -

यानंतर रोजच्या होणाऱ्या वादाला कंटाळून असिफने रागाच्याभरात सासूची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्तळावरुन पळ काढला. पळून जाण्यापूर्वी असिफने आपल्या एका मित्राला सासूची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर असिफच्या मित्राने हि गोष्ट बिबवेवाडी पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या असिफला अटक केली. बिबवेवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.