सोनीपत : वृत्तसंस्था – हरियाणातील सोनीपतमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला आहे. वडिलांवर नाराज असलेल्या मुलाने आपल्या मित्रांना वडिलांचा खून कऱण्यासाठी पैसे दिले. किरकोळ वादातून त्याने हि हत्या केली आहे. त्याने अत्यंत शांत डोक्याने हि हत्या केली. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला.
वडिलांसोबत होता वाद
हरियाणातील सोनीपतमध्ये राहणाऱ्या राजेंद्र नावाचे गृहस्थ त्यांच्या मोहित नावाच्या मुलासोबत आणि कुटुंबीयांसोबत राहत होते. या दोघा वडील- मुलामध्ये किरकोळ कारणावरून सतत भांडणं व्हायचे. यामध्ये सर्वात जास्त भांडण पैशांमुळे व्हायचे. आपले वडील आपल्याला पैसे देत नाहीत, याचा राग मोहितच्या मनात होता. यानंतर मोहितने पैसे न देणाऱ्या वडिलांना मारून त्यांची सगळी मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा मोहितने कट रचला.
मित्रांनाच दिली सुपारी
मोहितने त्याच्याच दोन मित्रांना वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. सचिन आणि मनदीप या दोन मित्रांना त्याने 7 लाख रुपयांची सुपारी दिली आणि आपल्या वडिलांचा खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्यास सांगितले. त्यांना 3 लाख रुपये ऍडव्हान्ससुद्धा दिले होते. त्या पैशातून मित्रांनी ऍडव्हान्स देऊन एक होंडा सिटी गाडी खरेदी केली.
अशा प्रकारे केला खून
ठरलेल्या प्लॅननुसार सचिन आणि मनदीप हे मोहितच्या वडिलांना निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी खून केला. खून केल्यानंतर या दोघांनी मृतदेह होंडा सिटी गाडीत घालून गंगा नदीपात्रात फेकून दिला. मृतदेह वाहत जाईल आणि त्याचा कधीच कुणाला थांगपत्ता लागणार नाही, असे आरोपींना वाटले. यादरम्यान मोहितने आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.
अशा प्रकारे झाला खुनाचा उलघडा
पोलिसांनी मोहितच्या वडिलांचा शोध घेत असताना मोहित आणि त्याच्या काही मित्रांकडे चौकशी केली. यावेळी काही जणांनी संदीप आणि मनजितसोबत त्यांना पाहिल्याचे सांगितले. यानंतर संदीप आणि मनजितची चौकशी केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी मोहितला अटक करून अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.