सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना काल ईडीच्यावतीने नोटीस बजावण्यात आली. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. मात्र, त्यांना चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. कारण पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यासोबत बैठका सुरु होत्या. दरम्यान, या भेटीगाठी व बैठकांमुळे सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान सोनियाजींच्या संपर्कात आलेल्या इतरही नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केली जात असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

बुधवारी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठवलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर देशात एकच खळबळ उडाली. या नोटिसीबाबत दोघांकडूनही काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचाही स्पष्ट झाले.

ईडीच्या नोटिसीवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

काल ईडीच्यावतीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली. तसेच दोघांनाही चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगितले. मात्र, काळ उशिरा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली तर त्याच्या संपर्कात असलेल्या इतर नेत्यांबरोबर राहुल गांधी यांनीही आज ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे सांगत आपण 5 जून रोजी चौकशीला हजर राहू, असे सांगितले.

Leave a Comment