Monday, February 6, 2023

नादखुळा ! बिगबाॅस फेम सातारकर अभिजित बिचुकलेचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपाॅझिट जप्त

- Advertisement -

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बिगबॉस फेम साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांना १३७ मते मिळाली आहेत. पंढरपूर पोटनिवडणूकीत त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असून आतापर्यंत अभिजीत बिचकुलेचे सहावेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. तरीही त्यांची निवडणूक लढण्याची हौस फिटलेली नाही.

अभिजित बिचुकले हे 2004 साली सातारा पालिकेची निवडणुक यश मिळाले नाही. 2014 मध्ये अभिजित बिचुकले आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात 392 मते मिळाली. 2014 खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा लोकसभेला 3677 मते मिळाली. या दोन्ही ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2019 सातारा-जावळी विधानसभा व सातारा लोकसभेच्या दोन्ही निवडणूका लढल्या. सातारा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात त्यांना 759 मते मिळाली. तर लोकसभेच्या निवडणूकीत 2412 मते मिळाली. येथेही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली. 2021 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्जही भरला. या निवडणुकीत त्यांना 137 मते मिळाली. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कै. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता.  ऐनवेळी अर्ज मागे

- Advertisement -

बिचकुलेच्या पत्नीनेही निवडणुकीत नशीब अजमावले

2009 मध्ये पत्नी अलंकृता अभिजित बिचुकले सातारा विधानसभा व सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे केले होते. खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात 12 हजार 662 मते मिळाली होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात 819 मते मिळाली होती. 2020 सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी आपली पत्नी अलंकृता बिचुकले यांना रिंगणात 1632 मते मिळाली होती.