Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीची Biopic येणार; हा अभिनेता साकारणार भूमिका

Sourav Ganguly Biopic
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sourav Ganguly Biopic । भारताचा माजी कर्णधार, ज्याच्यामुळे खरं तर टीम इंडियाला परदेशात जिंकायचं कसं, विरोधकांच्या आरे ला कारे करायचं कसं हे समजलं… तो सौरव गांगुली.. खरं तर गांगुलीनेच भारतीय क्रिकेटची बीजे रुजवली.. सेहवाग, झहीर, हरभजन सारख्या खेळाडूंना घडवलं तो आपला दादा…आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून दादा आता निवृत्त झाला असला तरी आता पुन्हा एकदा त्याची दादागिरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. होय, सौरव गांगुलीच्या जीवनावर लवकरच एक बायोपिक येणार आहे. यामध्ये गांगुलीची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे आता स्पष्ट झालं आहे. राजकुमार राव हे दादाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजकुमार राव (Rajkummar Rao) यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. मात्र हा बायोपिक खरंच येईल का? आणि यामध्ये अभिनेता कोण असणार याबद्दल गोंधळ होता, परंतु आता गांगुलीच्या बायोपिक बद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, राजकुमार राव दादांच्या म्हणजेच सौरव गांगुलीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. राजकुमार राव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितलं कि, हो, मी सौरव गांगुलीचा बायोपिक (Sourav Ganguly Biopic) करत आहे आणि दादाची भूमिका साकारत आहे. खरं तर दादाच्या या भूमिकेसाठी मी खूप घाबरलो आहे. कारण ही एक मोठी जबाबदारी आहे, पण ती खूप मजेदार असणार आहे. असं राजकुमार राव यांनी म्हंटल.. तसेच त्यांनी यासाठी बंगाली भाषा सुद्धा शिकली. या बायोपिकचं शूटिंग जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि चित्रपट डिसेंबर 2026 मध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

कोण आहे सौरव गांगुली – Sourav Ganguly Biopic

सौरव चंडीदास गांगुली… भारतीय क्रिकेटचा दादा… भारतीय क्रिकेटला शिस्त लावणारा, खेळाडूंना जिंकायला शिकवणारा हा अवलिया म्हणजे भारतीय क्रिकेटचा हिराच… ऑफ-साइडवरील शॉट्स, विशेषत: कव्हर ड्राइव्हसाठी तो प्रसिद्ध होताच, पण खऱ्या अर्थाने तो गाजला ते त्याच्या आक्रमक कॅप्टनशीप मुळे… कोणी आरे केलं कि त्याला दादा कारे करणारच.. मग समोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया असो वा कट्टर विरोधक पाकिस्तान.. गांगुलीच्या नेतृत्वाने भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर मजबूत स्थान मिळवून दिले.गांगुलीने भारतीय संघाला आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण बनवले, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग यांसारख्या खेळाडूंना घडवलं. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक आहे, ज्याने 2000-2005 दरम्यान 49 कसोटी सामन्यांपैकी 21 जिंकले. त्याच्या नेतृत्वात भारताने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली आणि 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट फायनल जिंकली. 2003 च्या विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली भारत अंतिम फेरीत पोहोचला.