तंत्रज्ञान विश्व | हॅलो महाराष्ट्र टीम
सामाजिक वातावरण व्यवस्थित रहावं यासाठी अनेक प्रयत्न सध्या अनेक सोशल नेटवर्किंग साईट करत आहेत. व्हॉट्सअपने संदेश पाठविण्याच्या संख्येवर आणलेली मर्यादा हीसुद्धा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. परंतु फॉरवर्डेड संदेशाचा स्रोत देता येणार नाही असं व्हाट्सअपने स्पष्ट केलं आहे. हा स्रोत उपलब्ध करुन दिल्यास कंपनीच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल असं व्हॉट्सअपला वाटतं.
मागील काही काळात जमावाने एकत्र येऊन दंगा, हिंसाचार करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली असताना असा संदेश पाठविणाऱ्याची ओळख व्हायला पाहिजे, असं मत भारत सरकारने व्हॉट्सअपपुढे मांडलं होतं, त्याला उत्तर देताना व्हॉट्सअपने वरील स्पष्टीकरण दिलं.