दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर Lizelle Leeची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Lizelle Lee
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिझेल लीने (Lizelle Lee) शुक्रवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 30 वर्षीय लीने (Lizelle Lee) सांगितले की ती जगभरातील देशांतर्गत टी-20 क्रिकेट खेळत राहील. दक्षिण आफ्रिकेसाठी 11 जुलैपासून नॉर्थहॅम्प्टनमध्ये सुरू होणाऱ्या महिला वनडे मालिकेपूर्वी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बर्मिंगहॅममध्ये 29 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत महिलांची टी-20 स्पर्धा होणार आहे. त्यामुळे लिझेल लीने (Lizelle Lee) अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्यांच्या यादीत लिझेल (Lizelle Lee) मिग्नॉन डू प्रीझनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. 2021मध्ये तिला ICC महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. “मला वाटते की मी माझ्या कारकिर्दीतील पुढच्या टप्प्यासाठी तयार आहे आणि जगभरातील देशांतर्गत T20 क्रिकेट खेळत राहीन. हा एक अविश्वसनीय प्रवास होता आणि माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्यांनी मला पाठिंबा दिला त्याशिवाय हे शक्य झाले नसते. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या सर्व त्यागांसाठी मी माझ्या कुटुंबाचे, विशेषत: माझी पत्नी तान्जा हिचे आभार मानू इच्छिते,” असे लिझेल म्हणाली आहे.

लिझेल लीने (Lizelle Lee) आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय 100 सामन्यांमध्ये 3,315 धावा केल्या आहेत. ज्यात 36.42 च्या सरासरीने 23 अर्धशतके आणि तीन शतके आहेत. तिने मार्च 2021 मध्ये लखनौ येथे भारताविरुद्ध नाबाद 132 धावा केल्या. 27-30 जून दरम्यान टॉंटन येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना तिने 42 धावा केल्या होत्या.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर