हॅपी बर्थडे थलपथी! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय साजरा करतोय ४७ वा वाढदिवस

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय चंद्रशेखर अर्थात प्रेक्षकांचा लाडका थलपती विजय आज ४७ वर्षांचा झाला आहे. अर्थात आज त्याचा वाढदिवस आहे. आपल्या अभिनय कलेच्या जोरावर एकापेक्षा एक जबरदस्त बॉल्कबस्टर चित्रपट देऊन आज विजय लाखो दिलों की धडकन झाला आहे. यामुळे त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक अतिशय उत्सुक असतात. मग त्याचा आगामी चित्रपट असो नाहीतर मग त्याच नवा लूक. त्याचे चाहते मोठ्या संख्येने त्याची प्रत्येक बारीक गोष्ट मोठ्या उत्सुकतेचे वाचतात आणि जाणून घेतात. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

आज विजयच्या वाढदिवसानिमित्त त्याचे लाखो चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना दिसत आहेत. थलपथी विजयने इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर सुंदर अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मात्र खुप कमी लोक हे जाणतात की, बॉलिवूड जगतातील दिग्गज अभिनेत्री प्रियांका चोप्रा आताची जोनास हिच्यासोबत विजयने आपल्या सिने क्षेत्रातील कारकीर्दीस सुरुवात केली होती. प्रिंयका आणि विजय एका तामिळ भाषिक चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाचे नाव ‘थामीझ्हान’ असे होते. हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. इतकेच नव्हे तर, विजयने सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीसोबतही काम केले आहे.

विजयच्या लुकवर आणि अभिनयावर अनेको अभिनेत्री आणि तरुणी फिदा आहेत. पण तो स्वतः मात्र एका सर्व साधारण मुलीवर फिदा झाला आणि तिला आपली जीवनसंघीनी बनवली. विजयच्या पत्नीचे नाव ‘संगिता’ आहे. आज हे दोघेही सुखी संसार करत आहेत आणि त्यांना दोन मुलंही आहेत. विजय आणि संगिता यांची प्रेमकहाणी एखाद्या कथानकासारखीच आहे.

संगिता युकेमध्ये राहत होत्या मात्र विजयच्या फॅनपैकी एक होत्या. मग एके दिवशी संगिता विजयच्या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर त्याला भेटण्यास गेली आणि त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. दोघेही एकमेकांना पसंत करु लागले आणि एके दिवशी विजयच्या वडीलांनी संगिताला घरी बोलावून विजयसोबत लग्न करण्यासाठी थेट मागणीच घातली. मग काय? संगिताने होकार दिला आणि २५ ऑगस्ट १९९९ साली विजय – संगिता यांचे लग्न झाले.

You might also like