हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बाहुबली’ या जगप्रसिद्ध चित्रपटाने साऊथ सुपरस्टार प्रभासला अनोखी ओळख मिळवून दिली. या यशानंतर प्रभासचा चाहता वर्ग लाखोंच्या संख्येने वाढला आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता प्रभास हॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रभास लवकरच हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजचा लोकप्रिय अॅक्शन सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल ७’मध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची एक पोस्ट जोरदार वायरल होत आहे. ही पोस्ट वाचून प्रभासच्या चाहत्यांना अतिशय आनंद झाला आहे. अनेकांनी तश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रभास लवकरच ‘मिशन इम्पॉसिबल ७’ मध्ये दिसणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
I gotta good feeling about this one… May be its true #Prabhas is in Mission Impossible 7..
Super excited 🥳🥳🥳🥳🥳 pic.twitter.com/t5uCwvRT2k— Radhe Shyam Prabhas Tamil Fans (@Princes48677134) May 25, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिशन इम्पॉसिबल’च्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन केलेले दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी या फ्रेंचाइजीच्या ७ व्या भागासाठी अभिनेता प्रभासशी संपर्क साधला आहे. मॅकक्वेरी यांनी प्रभासला या चित्रपटातील एक महत्त्वाची भूमिका देऊ केली आहे. क्रिस्टोफर मॅकक्वेरी आणि प्रभास याची भेट ‘राधे-श्याम’ चित्रपटाच्या इटलीतील शूटिंग दरम्यान झाल्याचे कळतेय. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा कुठूनही प्राप्त झालेला नाही.
https://www.instagram.com/p/CLQh5x_pvGs/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स ‘राधे-श्याम’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले आहे. तर ३० जुलै २०२१ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. साहजिकच या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या आशा आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभास एका लव्हर बॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CKxZDsVJJEp/?utm_source=ig_web_copy_link
‘राधे-श्याम’ या चित्रपटाव्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास झळकणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. सालार आणि नाग अश्विनच्या मल्टीस्टार ‘साय-फाय’ या चित्रपटातही प्रभास आपली जादू करणार आहे. प्रभासने तेलुगु चित्रपटांतून सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात केली होती. प्रभासने २००२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता टॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. ‘बाहुबली’च्या विक्रमी यशानंतर त्याची जगभरात फॅनफॉलोईंग तुफान वाढली आहे.