Soya Milk In Poshan Ahar | आपले सरकार हे समाजातील विविध घटकांचा विचार करून नवनवीन गोष्टी आणत असतात. त्याचा फायदा सगळ्याच लोकांना होत असतो. मुलांना मोफत शिक्षण घेता यावे त्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून सरकारने अनेक शाळा देखील सुरु केलेल्या आहेत. या सरकारी शाळांमध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य कपडे आणि त्यांना पोषण आहार देखील दिला जातो. यामध्ये सरकारने वेगवेगळे बदल केलेले आहेत. याद्वारे आता विद्यार्थ्यांना पूरक असा आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सरकारकडून भात, केळी, अंडी यांसारखे पदार्थ देखील दिले जात आहेत. शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये सोया मिल्क (Soya Milk In Poshan Ahar)देखील दिले जाणार आहे. प्राथमिक अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये ही योजना आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही नवीन योजना सरकारने काढलेली आहे.
सरकारने जिल्हा परिषद महानगरपालिका त्याचप्रमाणे खाजगी अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार देण्याची योजना सुरू केली आहे. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शैक्षणिक वर्षापासून या आहारात सुधारणा करून वेगवेगळ्या पोषण आहार दिला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना अंडी, केळी, मनुका यांसारख्या गोष्टी दिल्या जातात. आता नवीन शैक्षणिक वर्षापासून सोया मिल्क (Soya Milk In Poshan Ahar) देखील दिले जाणार आहे
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पट नोंदणी आणि उपस्थितीचे प्रमाण पाहून सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्था तर्फे चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळा अनुदानित खाजगी शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीपर्यंत सरकारने या योजनेचा विस्तार केला म्हणजे आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सरकारी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा आणि त्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने सरकारने नवनवीन योजना सुरु केलेल्या आहेत.