Soyabin Farmer | आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना तसेच इतर गोष्टी देखील आणत असतात. अशातच आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन (Soyabin Farmer ) या पिकाला 90 दिवसासाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावेत अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू होता. अखेर धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश आलेले आहे. ते म्हणजे आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमी भावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. याबाबतची माहिती धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली आहे.
या योजनेअंतर्गत आता सोयाबीनसोबत (Soyabin Farmer ) उडीद देखील खरेदी केली जाणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची आधारभूत किंमती 4892 रुपये प्रति क्विंटल केलेली आहे. आणि आता त्यानुसार या 90 दिवसात यानुसार खरेदी होणार आहे. महाराष्ट्रमध्ये हवामान सातत्याने बदलत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस दिसत आहे. आणि यामुळे सोयाबीनच्या पिकाचे दर देखील खूप पडलेले आहेत. आणि याचा आर्थिक फटका मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोयाबीनचे दर कमी झालेले आहे. मागील वर्षी देखील सोयाबीनचे नुकसान झाले होते आणि त्यासाठीच राज्य सरकारने प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भोगावे लागले होते.
अशातच आता धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी. तसेच त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, असे त्यांनी म्हटलेले आहे. तसेच खाद्यतील, सोयामिल्क उत्पादनावर आयात निर्यात शुल्क लाभावे सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे लागेल. याबाबत देखील धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या सोबत चर्चा केलेली आहे. आणि केंद्र केंद्रीय कृषिमंत्री देखील याबद्दल सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे.