सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मैनपुनरीमध्ये सपाचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह यांच्या गाडीला अपघात झाला आहे. देवेंद्र सिंह (Devendra Singh Yadav) हे कारने घरी निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. वाटेत त्यांच्या (Devendra Singh Yadav) कारला एका भरधाव ट्रकने टक्कर दिली. हि टक्कर एवढी भीषण होती कि त्या ट्रकने अक्षरशः कारला फरफटत रस्त्यावरुन 500 मीटर दूरवर नेले. या अपघातामध्ये दोन बाईकस्वार थोडक्यात बचावले आहेत. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. सपा जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह यादव (Devendra Singh Yadav) यांनी या अपघाताप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

काय घडले नेमके ?
समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह यादव (Devendra Singh Yadav) हे समाजवादी पार्टा कार्यालयाहून आपल्या घरी जायला निघाले होते. करहल या आपल्या निवासस्थानी कारमधून जात असताना माधव गेस्ट हाऊससमोर त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. मागून कारला बसलेल्या धडकेनंतर ट्रक चालकाने गाडी न थांबवता कारला तब्बल 500 मीटर दूरवर फरफटत नेले. दरम्यान, चालकाला यावेळी रोखण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला असता चालकालाने लोकांनीही चिरड्याचा प्रयत्न केला.

यानंतर रोडवर मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान दोन दुचाकीस्वारांनी भरधाव ट्रकच्या चालकाला आवर घालण्यासाठी बाईक पुढे आणली मात्र मग्रूर ट्रक चालकाने जराही तमा न बाळगता दुचाकीस्वारांनाही चिरड्याचा प्रयत्न केला. यानंतर हा सगळा प्रकार पाहून स्थानिकांनी ट्रकच्या मागे धाव घेतली. यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने अखेर ब्रेकवर पाय ठेवून ट्रक थांबवला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करत ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य