पुणेकरांसाठी मोठा दिलासा; हडपसर ते हिसार दरम्यान सुरु होणार स्पेशल एक्सप्रेस ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या काळात प्रवास करायचा म्हटलं कि , अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे नेहमी नवनवीन योजना आखत असते. प्रवाश्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे , आता हडपसर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे अनेकांना कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. याच अडचणी लक्षात घेऊन हडपसर ते हिसार दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली आहे. तसेच हि ट्रेन तब्बल 23 स्थानकावर थांबणार आहे.

हडपसर ते हिसार रेल्वेचे वेळापत्रक

गाडी क्रमांक 04724 हडपसर ते हिसार विशेष रेल्वे 4 नोव्हेंबरला हडपसर येथून दुपारी 2:15 मिनिटांनी निघून ती दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 मिनिटांनी हिसारला पोहचणार आहे. तसेच हिसार ते हडपसर विशेष रेल्वे गाडी क्रमांक 04723 हि 3 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी सोडली जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी हडपसरला पोहचणार आहे.

23 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार

हडपसर ते हिसार विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे . या स्थानकांमध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगस, सीकर, नवलगढ, चिरवा, लोहारू आणि सरदुलपूर यांचा समावेश आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे हडपसर आणि हिसार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांसाठी कन्फर्म तिकीट मिळवणे सोपे होईल, तसेच त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल. त्यामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचा नक्कीच फायदा होणार आहे.