Special Express Train | रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुखकर प्रवास मानला जातो. रेल्वेमुळे प्रवास चांगला होतो. आणि कमी खर्चात देखील होतो. त्यामुळे अनेक लोक या रेल्वेचा प्रवास करत असतात. अशातच आता रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यावरून उत्तर भारतात प्रवेश करणाऱ्यांसाठी ही बातमी खास आहे. अनेक लोक उत्तर भारतातून पुण्या मुंबईच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात मुंबई आणि पुण्यावरून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच जास्त असते. यावेळी त्यांना पुण्यावरून थेट उत्तर भारतात जाता येत नाही. यासाठी त्यांना वेगवेगळ्या गाड्या आणि ट्रेन बदलावे लागतात. परंतु आता त्यांचा हा त्रास कमी होणार आहे. कारण आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे ते गोरखपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्यातून थेट उत्तर भारतामध्ये जाता येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने (Special Express Train) घेतलेल्या या निर्णयाचा उत्तर प्रदेश त्याचप्रमाणे गोरखपुरला जाणाऱ्या संपूर्ण वेळापत्रक नक्की कशी असणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला जर या गणपतीच्या काळात तसेच सणासुदीच्या काळात उत्तर भारतात म्हणजेच तुमच्या गावी जायचे असेल, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
रेल्वे प्रशासनाने या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक देखील झाले केलेले आहे. या वेळापत्रकानुसार पुणे ते गोरखपूर गाडी क्रमांक 01431 ही रेल्वे 25 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी सोडले जाणार आहे. आणि गोरखपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.
त्याचप्रमाणे गोरखपूर ते पुणे गाडी क्रमांक 01432 ही रेल्वे 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी गोरखपुर वरून पुण्याला येण्यासाठी गोरखपूर रेल्वे स्थानकात दर शनिवारी रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तर ही गाडी पुण्याला तिसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे
ही गाडी दौंड, कार्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, विरंगणा, राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मलकापूर, जंक्शन वस्ती यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून मिळालेली आहे.