NPCI ची खास सुविधा ! आता इंटरनेटशिवायही तुम्हीकरू शकाल UPI पेमेंट, कसे ते जाणून घ्या

UPI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार सतत डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. कोरोना संकटाच्या काळात लोकांनीही रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले. त्यामुळे UPI ट्रान्सझॅक्शनमध्ये झपाट्याने वाढ झाली. मात्र, UPI ट्रान्सझॅक्शनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. इंटरनेट उपलब्ध नसेल तर डिजिटल पेमेंट करणे कठीण होते. देशाच्या अनेक भागात अजूनही इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. जर तुम्ही देखील इंटरनेट नसल्यामुळे UPI ट्रान्सझॅक्शन करू शकत नसाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करू शकाल.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार, तुम्ही इंटरनेटशिवाय तुमच्या फोनवरून UPI ​​पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास तुम्ही NPCI च्या *99# सुविधेद्वारे UPI पेमेंट करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही स्मार्टफोन तसेच बेसिक कीपॅड फोनद्वारे UPI पेमेंट देखील करू शकता.

NPCI ची *99# सुविधा काय आहे ?
*99# NPCI ची सुविधा ही USSD आधारित मोबाईल बँकिंग सर्व्हिस आहे. हे नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आले. सुरुवातीला ही सर्व्हिस फक्त BSNL आणि MTNL युझर्ससाठी उपलब्ध होती. *99# द्वारे UPI पेमेंटसाठी, तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, त्याच फोन नंबरवरून पेमेंट अ‍ॅपवर वन टाइम रजिस्ट्रेशन करणे देखील आवश्यक आहे.

NPCI सर्व्हिस द्वारे पैसे कसे पाठवायचे ?
– सर्व प्रथम, फोनचा डायल पॅड उघडा आणि *99# टाइप केल्यानंतर, कॉल बटणावर टॅप करा.
– आता तुम्ही नवीन मेनूवर पोहोचाल. यामध्ये तुम्हाला 7 पर्याय मिळतील.
– मेनूमध्ये Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN असे पर्याय उपलब्ध असतील.
– जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर नंबर 1 दाबून Send Money पर्याय निवडा.
– यानंतर, तुम्ही फोन नंबर, UPI ID किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकाल.
– त्यानंतर रक्कम एंटर करा आणि ट्रान्सझॅक्शन पूर्ण करण्यासाठी 4 किंवा 6 अंकी UPI पिन एंटर करा. नंतर ‘Send’ वर टॅप करा.