बाजारात आला नवरीसाठीचा स्पेशल मास्क! गळ्यात नाही तर आता तोंडाला बांधायचा नेकलेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला कोरोनाच्या संकटाने व्यापले आहे. दिवसेंदिवस कोरोना म्हणजे मृत्यू हे समीकरण जवळजवळ जुळत चालले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत च्या लोकांच्या समोर कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. अनेक राज्यांनी पूर्णतः लॉक डाउन करून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही दिवसांपासून थोडी सूट देत बाजारपेठ सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला होता. आत्तापर्यंत घराच्या बाहेर पडणं गरजेचं होत परंतु आता घरात बसणं जास्त आवश्यक आहे. परंतु काही ठिकणी सॅनिटायजर , मास्क अश्या सेफ्टी वस्तुंना परवानगी देत बजारपेठा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात लग्न सराईचे दिवस म्हंटले कि नव – नवीन गोष्टी बाजरात येत आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातल्या रांका ज्वेलर्स ने दुल्हन मास्क तयार केला आहे.

भारतात सर्वत्र लग्न सराईच्या कार्यक्रमात सोन्याला जास्त महत्व दिले जाते. म्हणूनच प्रख्यात असलेल्या रांका ज्वेलर्स ने खास नवरीकरिता नेकलेस टाईप मास्क तयार केला आहे. या मास्क मुळे नवरीची सेफ्टी हि सांभाळता येणार आहे. N-९५ या मास्कचा उपयोग करून सोन्याचे मास्क बनविण्यात आले आहे. हा मास्क २५ दिवसानंतर केव्हाही धुवू शकतो.

पुण्यातील रांका ज्वेलर्स च्या मालकांनी सांगितले कि , आत्ता मास्क वापरणे हे खूप महत्वाचे आहे. त्याच धर्तीवर हे अनेक क्लुप्त्या वापरून हे मास्क बनवले आहे. आत्ताच्या सोन्याच्या बाजारपेठांचा विचार करता या मास्क ची किंमत ६ लाख आसपास आहे. हा नेकलेस कम मास्क १२४ ग्रॅम सोने वापरून बनविण्यात आला आहे. या मास्क चे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत. या मास्क च कौतुकही सर्व स्तरातून होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.