हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळा म्हटलं की, प्रत्येकाला आंबा खाण्याची चाहूल लागते. तोही अस्सल देवगडचा हापूस आंबा होय. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभुमीवर हॅलो कृषी मोबाईल अॅपने आंबा प्रेमींसाठी थेट शेतकरी ते ग्राहक अशी आंबा विक्री सुविधा उपलब्ध केली आहे. “सगळ्यात स्वस्त देतो कारण थेट शेतकर्याच्या बागेतून येतो” अशी टॅगलाईन असलेल्या हॅलो कृषी मोबाईल अॅपच्या कराड येथील आऊटलेटला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अनेकदा आंबा आॅनलाईन खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच देवगड हापुसच्या नावाने कर्नाटक हापुस ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकारही घडत असतात. मात्र, आता हॅलो कृषी मोबाईल अॅपने महाराष्ट्रातील आपलं पहिलं आऊटलेट कराड शहरात सुरु केलं आहे. त्यामुळे कराडकरांना कोकणातील अस्सल आंबा योग्य दरात चाखता येणार आहे.
कुठे मिळेल सर्वात स्वस्त आंबा?
आज अक्षय तृतीयपासून अस्सल रसाळदार देवगड आंबा अगदी स्वस्त दरात विक्रीसाठी कराड शहरात हॅलो कृषीच्या आऊटलेटवर उपलब्ध झाला आहे. शासकिय उपजिल्हा रुग्णालय (काॅटेज हाॅस्पिटल) समोर, सिग्नलच्या शेजारीच हॅलो कृषीचे महाराष्ट्रातील पहिले आऊटलेट सुरु झाले आहे. हॅलो कृषीच्या आऊटलेटवर थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री केली जात असल्याने अतिशय कमी किंमतीत चांगल्या क्वालिटीचे आंबे मिळत आहेत.
तुम्हाला हापूस आंबा हवा असेल तर तुम्ही हॅलो कृषी ऐप डाऊनलोड करून त्याच्या माध्यमातून खरेदी करू शकता. तसेच कराड शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर सिग्नल शेजारी असलेल्या हॅलो कृषीच्या आऊटलेटला भेट देऊन हवा तो आंबा खरेदी करु शकता. येथे तुम्हाला देवगडसह आंब्याच्या असंख्य वर्हायटी उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. तर मग वेळ कसली घालवताय. आताच 7588193185 या मोबाईल क्रमांकावर ऑर्डर करून आंबे खरेदी करू शकता.
देवगड हापूस आंबा ऑनलाईनद्वारे खरेदी करण्यासाठी Hello Krushi हे ऍप इन्स्टोल करा. Click
हॅलो कृषीसोबत 50 हजार शेतकरी जोडलेले
महाराष्ट्रातील तब्बल 50 हजारहून अधिक शेतकरी हॅलो कृषीसोबत जोडलेले आहेत. राज्यात प्रथमच हॅलो कृषी मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांनाही आपल्या मालाला अधिक भाव मिळत असून ग्राहकालासुद्धा चांगल्या दर्जाचा शेतमाल स्वस्तामध्ये मिळत आहे. शेतकर्यासाठी हॅलो कृषी अॅप वरदान ठरत असून यावर सातबारा उतारा डाऊनलोड करणे, जमिन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान, सरकारी योजनांना अर्ज करणे, बाजारभाव माहिती अशा अनेक सुविधा मोफत देण्यात येत आहेत.
नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो. शनिवार (२२ एप्रिल) अक्षय्य तृतीया आहे. या सणापासून आंबे खाण्यास सुरुवात करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या सणाच्या काळात आंब्याची मागणी वाढते. दोन आठवड्यांपासूनच हापूस आंबा शहरांत दाखल झाला आहे. मात्र, त्याचे दर सामान्यांच्या आवक्यात नव्हते. सणाच्या तोडांवर आंब्याची आवक वाढली आहे.
असे आहेत आंब्याचे भाव
सध्या देवगड हापुस बाजारात खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यंदा हापुस आंब्याचे उत्पादन घटल्याने भाव वाढलेले आहेत. अनेक ठिकाणी देवगड हापुस आंबा 1,100 रुपये ते 1,200 रुपये डझन या दराने विक्रिसाठी आहेत. मात्र हॅलो कृषीच्या कराड येथील आऊटलेटमध्ये 800 रुपये दराने मोठ्या आकाराचा आंबा मिळतो आहे. ग्राहक हॅलो कृषीचं अॅप वापरत असेल तर त्याला 100 रुपये डिस्काउंट देण्यात येत आहे.