औरंगाबाद : घरातील ज्येष्ठ आजी – आजोबा आई – वडील यांचा मुलांनी, नातवडांनी सांभाळ करणे बंधनकारक आहे. ज्येष्ठ्यांच्या संरक्षणासाठी कायद्यात विशेष तरतूद दिली असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तनाच्या जनजागृती सप्तहानिमित्त शनिवारी घाटी रुग्णालयात वार्धक्यशास्त्र विभाग आणि औरंगाबाद फिजिशियन असोसिएशनतर्फे वेबमिनार घेण्यात आले.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी विजयपूर (कर्नाटक) येथील बी. एम. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. आनंद अंबाली यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत होणारे गैरवर्तन म्हणजे काय, याविषयीं माहिती दिली. फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे म्हणाले, आयुष्मान वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत असून त्यामुळे ज्येष्ठाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
घाटीतील वार्धक्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मंगला बोरकर यांनी वृद्धाची काळजी घेणाऱ्याकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत माहिती दिली. वेबमिनारसाठी डॉ. झेबा फिरदोस, डॉ. श्रुती कर्णिक आदिनी परिश्रम घेतले.