पोस्ट ऑफिसची खास योजना!! दोन वर्षांतच महिलांना बनवेल मालामाल

0
2
Post Office Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही काळामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना (Post Office Scheme) अत्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत. उत्तम परतावा आणि सुरक्षितेचा विश्वास यामुळे अधिक लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास रस दाखत आहेत. या योजनांमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना विशेष ठरत आहे. ही योजना केवळ महिलांसाठी असून त्यांना योजनेमार्फत चांगला परतावा दिला जात आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत (MSSC) महिलांना जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येत आहे. या गुंतवणुकीवर दोन वर्षांच्या कालावधीत वार्षिक 7.5% निश्चित व्याजदर लागू आहे. या योजनेत महिलांना कोणताही आर्थिक फटका बसत नाही. ही योजना कोणत्याही जोखमीशिवाय महिलांना चांगला परतावा देत आहे.

कर सवलतीसह आकर्षक परतावा

या योजनेतील आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे, कर सवलत. महिलांना या योजनेत जमा केलेल्या रकमेवर सरकारतर्फे कर सवलतीचा लाभ मिळत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या दिशेने महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.

व्याजाचा परतावा कसा मिळतो?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दोन वर्षांत एकूण 31,125 रुपयांचा व्याज परतावा मिळतो. पहिल्या वर्षी 15,000 रुपये, तर दुसऱ्या वर्षी 16,125 रुपये असे व्याजाचे वाटप होते. या योजनेंतर्गत महिलांना फक्त दोन वर्षांत सुरक्षित आणि चांगला नफा मिळवण्याची संधी आहे.

महिलांसाठी लाभदायक योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही फक्त महिलांसाठीच आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळते. कोणत्याही प्रकारची जोखीम नसल्यामुळे ही योजना महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जात आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.