रेमडेसिविरच्या काळ्याबाजारा विरोधात महाराष्ट्र पोलिसांचे ‘स्पेशल स्कॉड’; 54 प्रकरणांमध्ये मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोनाच्या घटनांमध्ये होणारी वाढ पाहता रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराची प्रकरणे समोर येत आहेत. ज्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष स्क्वाड तयार करण्यास सुरुवात केली आहे. जो या गोष्टींवर अंकुश ठेवेल. दुसर्‍या लहरीनंतर होणार मोठा काळाबाजार रोखण्यासाठी निर्माण केलेल्या विशेष स्क्वाडमध्ये आतापर्यंत 54 प्रकरणे सापडली आहेत. ज्यामध्ये आरोपी रेमडेसिवीरची बेकायदेशीरपणे काळाबाजार करुन गरजूंना फसवत होते.

हाती आलेल्या वृत्तानुसार, स्पेशल स्कॉड सोशल मीडियावर कायम स्कॅन करत असते, ज्यामध्ये या स्कॉडची एक टीम सोशल मीडियावरील ब्लॅक मार्केटींगवर लक्ष ठेवते. अनेकवेळा आरोपी पोलिसंपासून वाचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. याची दुसरी टीम लोकांच्या तक्रारींवर नजर ठेवते. जसे की, हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोअरच्या सभोवताली! रुग्णांनच्या कुटूंबाशी संपर्क साधत आहेत, रेमडेसिवीरसाठी जे ब्लॅकमध्ये विक्री करण्याचे आश्वासन देत आहेत. त्यांच्यावर मोठी कारवाई केली जात आहे.

या स्क्वाडची तिसरी टीम ह्यूमन इंटेलिजन्सवर काम करत आहे. त्यांचे स्वत: चे खबरी आहेत ज्यांचे लक्ष अशा काळ्या बाजारावर आहे. त्यांना याची जाणीव होताच ते त्याबद्दल स्पेशल स्कॉडला माहिती देतात. आणि मग स्कॉड त्यावर पूर्ण कारवाई करुन घेते. यापूर्वी हे काम एफडीए करत पण वाढत्या काळ्या बाजाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना स्वत: चे खास पथक तयार करावे लागले.

You might also like