Friday, June 2, 2023

नववधूच्या हातच्या स्पेशल चहाने सासरच्या मंडळींची उडवली झोप, रात्री दोघेजण आले आणि….

पिलानी : वृत्तसंस्था – राजस्थानमधील झुंझुनूच्या मंद्रेला शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने पती आणि सासूला नशायुक्त पदार्थ पिण्यास दिला. त्यानंतर तिने दोन मुलांना रात्री घरी बोलावून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाले.

काय आहे नेमके प्रकरण ?
मंद्रेला शहरातील वॉर्ड 3 चे रहिवासी जगदीश शर्मा यांनी त्यांचा मुलगा चेतन शर्मा याचे लग्न 28 नोव्हेंबर 2021 रोजी चिरावा येथील रहिवासी निकिता या मुलीशी झाले होते. या दोघांचे लग्न झाल्यापासून सुनेचे पती आणि घरातील इतर सदस्यांशी पटत नव्हते. तसेच लग्नानंतरही ती पतीपासून काही ना काही निमित्त सांगून अंतर ठेवत असे. घरात तेढ पसरवण्याच्या उद्देशाने सून कुटुंबीयांना एकमेकांविरोधात भडकवायची.

पीडित तरुण हा घरी राहून ऑनलाइन काम करतो. घटनेच्या दिवशी रात्री काम करत असताना चेतनने निकिताकडे चहा मागितला. निकिताने चहामध्ये नशेचा पदार्थ मिसळून प्यायला दिला, त्यामुळे चेतनची प्रकृती खालावली. यानंतर निकिताने शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांना दाखवून पतीला घरी आणले. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिने शेजारी बसलेल्या सासूला गरम पाणी दिले. त्या पाण्यात तिने नशेचे औषध मिसळले. त्यामुळे पती आणि सासू जागीच बेशुद्ध झाले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.