हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोक हे देवभक्त अनेकजण देशभरातील वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. जम्मू काश्मीर येथील प्रसिद्ध वैष्णोदेवी साठी दरवर्षी अनेक भाविक जात असतात. तुम्ही सुद्धा वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वैष्णोदेवीसाठी रेल्वेने स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. ही ट्रेन कोणत्या ठिकाणाहुन जाईल? तिचे तिकीट किती? याबाबत आज आपण जाणून घेऊयात
बिहारच्या कटिहार आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकांदरम्यान सूरु केली ट्रेन
वैष्णवदेवी यात्रेला जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी गर्दीचा विचार करून बिहारच्या कटिहार आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेन सुरु करण्यात आली आहे. उत्तर रेल्वे (NR) झोनद्वारे ही ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन फेस्टिवल स्पेशल ट्रेन म्हणून धावणार आहे. कटिहार – श्री माता वैष्णोदेवी कटरा – कटिहार आरक्षित फेस्टिव्हल विशेष या विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. उत्तर रेल्वेने सणासूदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून तसेच गर्दी कमी करण्यासाठी ही स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये 3 क्लास इकॉनॉमी असे डब्बे असून याचे तिकीट 2145 एवढे आहे.
कोणत्या ठिकाणी जाते ही गाडी?
SVDK-कटिहार-SVDK राखीव फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस ट्रेन ही एकूण 20 स्थानकाला भेट देईल. यामध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन, जम्मू तवी, पठाणकोट कॅंट, जालंधर कॅंट, लुधियाना, अंबाला कॅंट, यमुनानगर जगाधरी, सहारनपूर, मुरादाबाद, बरेली, सीतापूर, गोंडा, बस्ती, गोरखपूर, छपरा, हाजीपूर, बरौनी जंक्शन, बेगुसराई, बेगुसराई , आणि नौगाचिया या स्थानकाचा समावेश आहे.
कसे आहे वेळापत्रक?
श्री माता वैष्णो देवी कटरा येथून ही गाडी 15 नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे. 15 तारखेला ही ट्रेन रात्री 9:30 ला निघाली होती आणि 17 नोव्हेंबरला 9:00 वाजता ती कटिहार येथे पोहोचली. तसेच ही गाडी परत येण्यासाठी कटिहार येथून 11:00 वाजता निघुन 17 नोव्हेंबरला केंद्रशासित प्रदेशात 19 नोव्हेंबर रोजी 11:00 वाजता पोहोचली.
गाडी 1500 किलोमीटर हुन अधिक अंतर कापते फक्त 35 तासात
SVDK -कटीहार SVDK – कटीहार आरक्षित फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस ट्रेन ही तब्ब्ल 1500 किलोमीटरहुन अधिक अंतर 35 तासात कापते. तर ही ट्रेन लोहित एक्स्प्रेस पाठोपाठ या मार्गावरील ही सर्वात वेगवान ट्रेन म्हणून गणली जात आहे.