हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Special Trains For Mumbai । महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी आहे. या दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी मुंबईच्या दिशेने चैत्यभूमीवर जात आहेत. या अनुयायांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, त्यांना कोणत्याही प्रकारच्या गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून काही विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. यातीलच एक ट्रेन म्हणजे कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई अनारक्षित विशेष गाडी .. हि ट्रेन आज चालवण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेचं वेळापत्रक कसं आहे? कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर ती थांबेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात.
कसं असेल वेळापत्रक ? Special Trains For Mumbai
तर मित्रानो, कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी हि विशेष ट्रेन 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलबुर्गी येथून सोडली जाणार आहे आणि 6 डिसेंबरच्या सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी मुंबई येथे पोहचेल. यानंतर परतीच्या प्रवासासाठी, हि ट्रेन 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी 11:30 वाजता कलबुर्गी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. Special Trains For Mumbai
कोणकोणत्या स्थानकांवर थांबेल –
कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी हि विशेष ट्रेन गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर यांसह महत्त्वाच्या स्थानकावर थांबेल. त्यामुळे या शहरातील आंबेडकरी अनुयायांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आरामदायी प्रवास अनुभवता येईल. प्रवाशांची वाढती संख्या बघता या ट्रेनची रचना देखील त्याप्रमाणे करण्यात आली आहे. 22 स्लीपर / सामान्य द्वितीय / सेकंड सीटिंग (अनारक्षित) कोच आणि 2 लगेज-कम-ब्रेक व्हॅन्स अशा मिळून 24 कोचेसचा समावेश असलेली ही गाडी मोठ्या प्रवासी संख्येला सामावून घेऊ शकेल.




