गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोकणात जाणाऱ्या ६ गणपती विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-पनवेल या मार्गावर दोन विशेष फेºया चालविण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.५० वाजता विशेष गाडी सुटेल. ती सकाळी ६.३० वाजता सावंतावाडी रोड येथे पोहोचेल. सावंतवाडी रोडहून सकाळी १०.५५ वाजता ती पनवेलसाठी रवाना होईल. ही गाडी पनवेल येथे रात्री ११.४० वाजता पोहोचेल.

पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे या मार्गावर दोन विशेष फे-या चालविण्यात येतील. पनवेलहून ३१ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२.५५ वाजता सुटेल. सावंतवाडी रोड येथे दुपारी २.१० वाजता पोहोचेल. ती सावंतवाडी रोडहून दुपारी ३.२० वाजता सुटून पुणे स्थानकात सकाळी ७.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.

पुणे-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर दोन विशेष जादा फे-या चालविण्यात येतील. ही गाडी पुण्याहून २९ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२.१० वाजता सुटेल. ती पहाटे ४ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडी रोड स्थानकातून ती सकाळी ५.२० वाजता रवाना होईल व लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर दुपारी ४.५० वाजता पोहोचेल.

हे पण वाचा –

गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज

टिळकांनी पुण्यातील ‘या’ ठिकाणी स्थापन केला पहिला सार्वजनिक गणपती

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव …

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

Leave a Comment