धक्कादायक!! फुटबॉल सामना सुरू असतानाच प्रेक्षक गॅलरी कोसळली; 200 जखमी तर 5 गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळुन तब्बल 200 लोक गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना केरळ येथे घडली आहे. केरळ येथील मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर येथे एका फुटबॉल सामन्यासाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. ती अचानक कोसळली आणि जवळपास २०० लोकं जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शनिवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली असून सदर घटना घडली तेव्हा या प्रेक्षक गॅलरीवर २००० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. यामध्ये 5 जणांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Leave a Comment