खंडापीठाने विद्यापीठाला बजावली कारणे दर्शक नोटीस

0
62
bAMU
bAMU
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयात पी एच डी साठी प्रवेश देण्यात यावा, या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगास कारणे दर्शक नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लढ्ढा यांनी दिला आहे.

संशोधक चंद्रशेखर भाऊराव जाधव यांनी ॲड. शिरिष कांबळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. याचिकाकर्ते चंद्रशेखर जाधव यांनी २०१४ ला पेट दिली होती. परीक्षेत ते एसबीसी, एसटी आणि ओबीसी च्या जागांवर गुणवत्ता यादीत आले होते. गुणवत्ता यादी २०१५ साली प्रसिद्ध होती. तत्कालीन नियमाप्रमाणे गुणवत्ता यादीमधील संशोधकांसाठी मार्गदर्शक देत होते.

पण, विद्यापीठाने जाधव यांना संशोधन मार्गदर्शक उपलब्ध करून दिले नाही. यामुळे याचिकाकर्त्याने मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावे म्हणून पत्रव्यवहार केला. मात्र विद्यापीठाने त्यांना मार्गदर्शक दिले नाही. त्यांनी विद्यापीठाला दोन वेळा अर्ज केला. तरीही विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक आणि प्रवेशपत्र दिले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी याचिका दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here