भरधाव कारची कमानीला भीषण धडक; एअरबॅग उघडूनदेखील तरुणाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिमवरून घरी परत येत असताना अचानक अपघात झाल्याने एका बिल्डरच्या मुलाला जागीच जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे चारचाकी गाडीच्या एअरबॅग उघडूनसुद्धा त्याचा मृत्यू झाला आहे. या मृत तरुणाचे नाव अथर्व आशितोष नावंदर असे आहे. रस्त्यात आडव्या आलेल्या कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अपघातामध्ये अथर्वच्या मांडीचे हाड मोडले आहे. तसेच त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे महाविद्यालये बंद असल्याने अथर्व आपल्या घरी परत आला होता. मंगळवारी तो नेहमी प्रमाणे पहाटे जिमला गेला होता. पण अचानक काहीतरी काम आठवल्याने तो परत घराकडे निघाला होता. या दरम्यान त्याने रस्त्यात असणाऱ्या एका कमानीला कारची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.अथर्वच्या बाजूनेच कार कमानीला आदळल्याने एअरबॅग उघडूनदेखील त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अथर्वला कारमधून बाहेर काढून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अथर्वला मृत घोषित केले आहे.

अथर्वचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. तर अथर्व सध्या मुंबईच्या महाविद्यालयातून डेटा सायन्सची पदवी घेत होता. त्याच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला, हे अजून समजू शकले नाही. पण घटनास्थळापासून 15 फूट अंतरापर्यंत जोरात ब्रेक दाबल्याचे टायरचे निशाण दिसत आहेत. रस्त्याच्या मध्ये अचानक कुणीतरी आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्न अथर्वने केला असावा. या दरम्यान कारचा वेग किमान 120 ते 130 असल्यामुळे कार नियंत्रित करता न आल्याने कार कमानीवर जाऊन आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment