कोविड -१९ च्या लसीचे वितरण करण्यासाठी Om Logistics आणि SpiceJet एअरलाइन्समध्ये झाला करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संपूर्ण जगासमवेत भारतही कोरोना साथीच्या लसीची प्रतीक्षा करीत आहे. ब्रिटनने कोरोना लसीला अगदी तातडीची मान्यता देऊन आपत्कालीन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. भारतात Pfizer, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोरोना लसीचा तातडीने वापर करण्यासाठी सरकारकडे विचारणा केली आहे. ज्यावर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीच्या ट्रांसपोर्टेशनची तयारी सुरू झाली आहे. यावेळी स्पाइसजेट आणि ओम लॉजिस्टिकने करार केला आहे. ज्यामध्ये या दोन्ही कंपन्या कोविड लसीचा वेगवान व सुलभ पुरवठा सुनिश्चित करतील.

त्याच वेळी स्पाइसजेटने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड लस स्टोअर करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्ड स्टोरेज हाऊस तयार केले जात आहे. जेणेकरुन कोविड लस सुरक्षितपणे ठेवता येईल. स्पाइसजेटने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याची मालवाहतूक सेवा स्पाइस एक्सप्रेस उणे 25 डिग्री सेल्सियस ते उणे 40 डिग्री सेल्सियस पर्यंत नियंत्रित तापमानात लस आणि औषधांच्या ट्रांसपोर्टेशनसाठी वचनबद्ध राहील.

ओम लॉजिस्टिकचे देशात आणि जगात मोठे नेटवर्क आहे
ओम लॉजिस्टिक देशातील अशा काही निवडक कंपन्यांपैकी एक आहे. ज्यांचे देश-विदेशात मोठे नेटवर्क आहे. ओम लॉजिस्टिकचे जगभरात 12 हजाराहून अधिक ऑफिसेस आहेत. त्याचबरोबर, भारतात ही कंपनी 19 हजाराहून अधिक पिन कोडवर डिलिव्हरी करते. या प्रकरणात ओम लॉजिस्टिक्स आणि स्पाइसजेटची भागीदारी कोविड लशीच्या सुरक्षित ट्रांसपोर्टेशनचे आश्वासन देते.

https://t.co/wkoA8plQmm?amp=1

लसीचे ट्रांसपोर्टेशन 17 मालवाहू विमानांच्या मदतीने होईल
स्पाइसजेटने कोविड -१९ लसीची देशात आणि जगभरात सुरक्षित वाहतूक करण्यासाठी 17 मालवाहू विमान तयार केले आहे. ज्यामध्ये तापमान व्यवस्थापित केले जाऊ शकते. मार्चमधील लॉकडाऊन दरम्यान स्पाइसजेटने आवश्यक वस्तू योग्य त्या ठिकाणी पोहोचण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

https://t.co/N2a1zC7bbD?amp=1

https://t.co/UXU4EnMMnb?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment