राशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात राशिद खानने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकात तब्बल १७ निर्धाव चेंडू टाकले. त्याच्या स्पेलमध्ये त्याने केवळ ७ धावा दिल्या आणि त्या बदल्यात ३ बळी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या सातही धावा या एकेरी धाव काढून मिळवलेल्या होत्या. कोणत्याही फलंदाजाला त्याने चेंडू सीमापार मारू दिला नाही. IPL कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

त्याच्या अफलातून कामगिरीनानंतर भारताचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंगदेखील त्याच्या गोलंदाजीवर फिदा झाला. त्याने ट्विट करून राशिदचं कौतुक केलं. “व्वा लाला. तू अप्रतिम गोलंदाजी केलीस. तू तर चॅम्पियन गोलंदाज आहेस”, असं म्हणत हरभजनने त्याचं कौतुक केलं.

दरम्यान, वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादने या विजयासह आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवत गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like