हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Split AC Vs Window AC) उन्हाळा जसजसा वाढत चाललाय तसतशी वातावरणातील उष्णता वाढतेय. परिणामी उकाड्याने जीव नकोसा झालाय. अशावेळी घरात एसी असावा असं प्रत्येकाला वाटत. पण पहिलाच AC खरेदी करायचा असेल तर मात्र खूप कन्फ्युजन होत. त्यासाठी खूप रिसर्च करावा लागतो आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे, एसी तर घ्यायचाय पण Split AC की Window AC? असा प्रश्न पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर चिंता नसावी. कारण याबाबत पडणाऱ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर या दोन्ही एसींमधला फरक जाणून घेऊया. यांचे फायदे आणि तोटे समजून घेऊया.
Split AC का Window AC???
1. विंडो एसीपेक्षा स्प्लिट एसी महाग असतो
विंडो एसीपेक्षा स्प्लिट एसी महाग असतो. विंडो एसी कमी किंमतीत सहज ऑनलाईन, ऑफलाईन मिळतो. पण विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसी ऑनलाईन काय आणि ऑफलाईन काय जास्त किंमतीत विकला जातो. (Split AC Vs Window AC) दोन्ही प्रकारच्या एसींपैकी स्टार रेटिंग पाहिल्यावर समजते की कोणता एसी अधिक वीज वाचवेल. शिवाय इन्व्हर्टर एसी नॉन इन्व्हर्टर एसी पेक्षा जास्त बचत करण्यास मदत करतो, हे स्पष्ट आहे.
2. खोलीच्या आकारानुसार एसीची निवड करा
तुम्ही ज्या खोलीमध्ये एसी लावणार आहात त्या खोलीचा आकार किती मोठा आहे ते पाहून एसीची निवड करा. कारण तुमचा एसी किती टनाचा आहे यावर कूलिंग अवलंबून असतं. (Split AC Vs Window AC) त्यामुळे जर तुमची खोली लहान असेल तर बेस्ट कुलिंगसाठी विंडो एसी उत्तम. तसेच जास्त मोठी खोली असेल तर कूलिंगसाठी स्प्लिट एसी योग्य ठरेल. एकंदरच काय तर तुमच्या खोलीच्या आकारावर एसी किती टनचा असायला हवा ते पाहून निवड करा.
3. कोणत्या एसीसाठी इंस्टॉलेशन चार्जेस कमी पडतील? (Split AC Vs Window AC)
अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या नव्या एसीच्या खरेदीवर इंस्टॉलेशन चार्जेस अजिबात घेत नाहीत. मात्र, काही कंपन्यांकडून इंस्टॉलेशन चार्जेस घेतले जातात. याबद्दल विचार केला तर, विंडो एसी खरेदी करताना इंस्टॉलेशन चार्ज कमी पडतील. त्या उलट स्प्लिट एसी लावण्यासाठी अधिक चार्जेस द्यावे लागतील. कारण, स्प्लिट एसीत इनडोर यूनिट आणि आउटडोर यूनिट असे दोन यूनिट्स लावावे लागतात. त्यामुळे इंस्टॉलेशन चार्जेसचा विचार केला असता विंडो एसी स्वस्त वाटू शकतो.
4. कोणत्या एसीचं सर्व्हिसिंग पडेल महाग?
एसी खरेदी करताना त्याच्या मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंगचा विचार करावाच लागतो. कारण एसीची वेळावेळी सर्व्हिसिंग केली नाही तर त्याचं आयुष्य कमी होतं. (Split AC Vs Window AC) याविषयी विचार केला तर समजेल की, विंडो एसीचा सर्विंग चार्ज कमी असतो. तर स्प्लिट एसीची सर्व्हिसिंग थोडी महाग असू शकते.
एकूणच काय तर एसी खरेदी करताना काही महत्वाच्या घटकांचा विचार करावा लागतो. शेवटी उपकरण खरेदी करतेवेळी देखील फायदे तोटे लक्षात घ्यावे लागतातच. वरील मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल की, तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी कोणता एसी अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे एसी खरेदी करताना या गोष्टींना जरूर लक्षात घ्या. (Split AC Vs Window AC)