महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला महाबळेश्वरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. येथील छ. शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, जिल्हा बॅंकेचे राजेंद्रशेठ राजपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, जेष्ठ नेते डी.एम.बावळेकर, काँग्रेसचे नंदकुमार बावळेकर, सलीम बागवान यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर शहरातून मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाच्या प्रारंभी छ. शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे राजेश कुंभारदरे व राष्ट्रवादीचे ॲड. संजय जंगम यांनी प्रास्ताविक करून लखीमपूर खिरी घटनेतील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तद्नंतर मोर्चास सुरुवात झाली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा मुख्य बाजारपेठ मार्गे सुभाष चौक, एस.टी.स्थानक परिसरातून पंचायत समिती मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला. तहसीलदार कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते सभापती संजय गायकवाड, राजेंद्र राजपुरे, घनश्याम सपकाळ, काँग्रेसचे नंदकुमार बावळेकर आदींची मनोगते व्यक्त करताना लखीमपूर खिरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात रोष व्यक्त करून निषेध केला. तद्नंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भागवत उपस्थीत होते तर, मोर्चा वेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे नेते पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश कुंभारदरे, जेष्ठ नेते डी.एम.बावळेकर, काँग्रेसचे नंदकुमार बावळेकर, सलीम बागवान यांच्यासह नगरसेवक किसन शिंदे, विमलताई पार्टे, विमल ओंबळे, शारदा ढाणक, श्रद्धा रोकडे, शिवसेनेच्या लीलाताई शिंदे, राजश्री भिसे, राष्ट्रवादीचे दत्तात्रय वाडकर, विशाल तोष्णीवाल, शरद बावळेकर, समन्वय समितीचे प्रवीण भिलारे, तौफिक पटवेकर, रोहित ढेबे, संदीप मोरे, अशोक शिंदे, धोंडीराम जंगम, अकबर शारवान, शिवसेनेचे प्रवीण शिंदे, संतोष आबा शिंदे, शंकर ढेबे, राजा गुजर, चंद्रकांत पांचाळ, अशोक ढेबे, सुनील ढेबे, राजेंद्र सोंडकर, उस्मान खारकंडे, रामचंद्र शिंदे, अर्बन बँक अध्यक्ष सचिन धोत्रे, संचालक बाळासाहेब कोंढाळकर, जावेद वलगे, अल्ताफ मानकर, अमजद पटेल, किसन खामकर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर, सी.डी.बावळेकर व सदस्य आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.